अज्ञात चोरट्याविरुद्ध दाखल
| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील किंजळोली बुद्रुक शाळेत अज्ञात चोरट्यांनी शाळेच्या दरवाजाचे कुलूप फोडून शाळेतील सुमारे 30 हजार रुपयांचे साहित्य लंपास केले असल्याची तक्रार शाळेच्या मुख्याध्यापकांनी महाड शहर पोलीस ठाण्यात केली आहे. महाड तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या किंजळोली बुद्रुक येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 23/24 जानेवारीदरम्यान झाली आहे.
शाळेचे सुनील दत्तात्रय जंगम यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार 23 जानेवारीच्या 5 वाजल्यापासून ते 24 जानेवारीच्या 9.45 दरम्यान अज्ञात चोरट्याने शाळेच्या दरवाजाचा कुलूप तोडून टीव्ही, साऊंड बॉक्स, दोन अॅम्प्लि फायर, कॉम्प्युटर मॉनिटर, दोन स्पीकर, एक स्टेबलायझर, दोन ब्लॅक बोर्ड असे सुमारे 30 हजारांचे साहित्य चोरून नेले. महाड शहर ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल दाखल झाला असून, पुढील तपास पो.ना. एस.एस. बोटे करीत आहेत.