| कोलाड | प्रतिनिधी |
गोवे ग्रामपंचायत हद्दीत अवैध दारू विक्रीबाबत विक्रेत्यांना वारंवार सूचना करूनदेखील दारू विक्री बंद होत नसल्याची तक्रार कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या दखल घेत सपोनि अजित साबळे यांनी सापळा रचून मुठवली बु बौध्दवाडी गावाच्या हद्दीतील दारू धंद्यावर पोलिसांनी कारवाई केली. तर गोवे येथील दारू विक्रेताही पोलिसांच्या रडावर असल्याचे बोले जात आहे.
गोवे, मुठवली गावात राजरोसपणे अवैध गावठी दारू विक्री होत असल्याने याविरोधात ग्रामस्थ, महिलांनी 26 जानेवारी रोजी उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन पोलिसांना दिले होते. या निवेदनाची तातडीने दाखल घेत कोलाड पोलीस सपोनि अजित साबळे यांनी सापळा रचून कारवाई केली आहे.