| रत्नागिरी | प्रतिनिधी |
राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची दिवसाढवळ्या हत्या करणार्या रिफायनरीचा दलाल पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर भादंवि 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचा बनाव करून पत्रकाराची ठरवून हत्या केल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाल्यानंतर आंबेरकरविरूध्द खुनाचे कलम लावण्यात आले आहे.
रत्नागिरी येथील सर्व पत्रकार तसेच मराठी पत्रकार परिषदेनेदेखील पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. त्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. या दबावाचा अखेर फायदा झाला असून पोलिसांनी आंबेरकर यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आंबेरकर याच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम देखील लावले जावे अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने केली असल्याची माहिती एस.एम.देशमुख यांनी दिली आहे.