| आगरदांडा | वार्ताहर |
माजी मुख्यमंत्री बॅ, ए.आर. अंतुले यांच्या जयंती निमित्ताने मुरुड वसंतराव नाईक महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. उपप्राचार्य डॉ विश्वास चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अॅड इस्माईल घोले, सुभाष महाडिक , वासंती उमरोटकर,प्राचार्य डॉ. मेहबूब नगरबावडी, डॉ श्रीशैल बहिरगुंडे, डॉ.सुभाष म्हात्रे, डॉ.मधुकर वेदपाठक, डॉ.जनार्दन कांबळे, डॉ.मुरलीधर गायकवाड, गार्मी गिध, सोनम पाटील,प्रा.प्रणव बागवे, कृष्णा अंबाजी,सज्जाद हसवारे, डॉ.सीमा नाहिद, डॉ.नारायण बागुल, इस्माईल शेख, डॉ.गजानन मुनेश्वर,एन एस एस चे विद्यार्थी व महाविद्यालयातचे कर्मचारी वृंद मोठ्या प्रमाणात हजर होते.
उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील बेलीवाडी व सुमरादेवी आदिवासी वाडीवर 50 सोलर लॅम्पचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.तसेच आदिवासी वाडीतील लहान मुलांनसह आदिवासी बांधवांना व महिलांना खाऊ वाटप करण्यात आले. सूत्रसंचाल डॉ. सुभाष म्हात्रे व आभारप्रदर्शन उपप्राचार्य डॉ.विश्वास चव्हाण यांनी केले.