| मुंबई | प्रतिनिधी |
महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सने रॉयल बेंगळुरूचा 9 विकेटनी पराभव केला. मुंबईचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. ब्रेबोर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 155 धावांचे आव्हान दिले होते. मुंबईने ते 34 चेंडू राखून पार केले.
प्रथम फलंदाजी करणार्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला 155 धावा करता आल्या. आरसीबीच्या एकाही फलंदाजाला 30च्या पुढे धावा करता नाहीत. उत्तरादाखल मुंबईची सुरुवात चांगली झाली. हेली मॅथ्यूज आणि यास्तिका भाटिया या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 5 षटकात 45 धावांची भागिदारी केली. यास्तिका 23 धावांवर बाद झाली. त्यानंतर आलेल्या साइवर ब्रटने आरसीबीच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.
मॅथ्यूज आणि ब्रटने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला, यामुळे मुंबईने ही लढत 86 जिंकली. मॅथ्यूजने 38 चेंडूत नाबाद 77 धावांची खेळी केली. यात 13 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. तर ब्रटने 29 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या. या दोघांनी दुसर्या विकेटसाठी नाबाद 114 धावांची भागिदारी केली. आरसीबीने डावाची सुरूवात चांगली केली होती. पण मुंबईच्या गोलंदाजांनी नंतर कमबॅक केले. याला फिल्डर्सनी सुरेख दिली. आरसीबीकडून चांगली फलंदाजी करणार्या एलिसा पॅरीला मुंबईच्या फिल्डर्सनी धावबाद केले. सामन्यातील 9व्या षटकात एक धाव घेण्याचा प्रयत्न करणार्या पॅरीला हुमायरा काजीने डायरेक्ट थ्रो मारला आणि धावबाद केले.
स्पर्धेत याआधी झालेल्या पहिल्या सामन्यात मुंबईने गुजरात जायंट्सचा 143 धावांनी पराभव केला होती. महिला टी-20 क्रिकेटमध्ये धावांचा विचार करता हा सर्वात मोठा विजय ठरला. दुसर्या बाजूला आरसीबीचा हा सलग दुसरा पराभव ठरला आहे. याआधी पहिल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा 60 धावांनी पराभव केला होता. सलग दोन विजयानंतर मुंबई इंडियन्स गुणतक्त्यात अव्वल स्थानी आहे. दुसर्या स्थानी दिल्ली तर तिसर्या स्थानी युपी वॉरियर्सचा संघ आहे. आरसीबी आणि गुजरात यांनी त्यांच्या पहिल्या दोन्ही लढती असून ते चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.