खालापूर- सावरोली येथे सिटी हेच स्टेशन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
खोपोली व आसपासच्या परिसरातील ग्राहकाना नॅचरल गॅसचा पुरवठा सुरळित होण्यासाठी महानगर गॅसने खालापूर- सावरोली येथे सिटी हेच स्टेशन (सीजीएस) सुरू केले आहे. रायगड जिल्ह्यातील सीजीएसचे हे पहिले स्टेशन आहे. यामुळे परिसरातील नागरिकाना घरोघरी देणारा महानगर गॅस तसेच वाहनांसाठी सीएनजी गॅसचा आता अखंडीत होणार आहे.
महानगर गॅसतर्फे सीएनजी गॅस स्टेशन अनेक महामार्गावर उभारण्यात आले आहेत. घरगुती ग्राहकांसाठी पाईप गॅस पुरवठा मुंबई-ठाणे-नवी मुंबईबाहेरील क्षेत्रासाठीही करावा, अशी ग्राहकांची मोठी मागणी होती. त्यानुसार कंपनीने खालापूर तालुक्यातील सावरोली येथे सीजीएस सेंटर नुकतेच सुरू केले. यामुळे परिसरातील घरगुती ग्राहकाना पाईप गॅसद्वारे गॅस पुरवठा केला जाऊ शकतो. परिणामी सिलिंडरवर ग्राहकाना आता अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही.
सावरोली येथील सीजीएस हे गेलच्या दहेज-उरण गॅस ट्रान्समिशन पाईपलाईनला आणि नॅशनल गॅस ट्रान्समिशन सिस्टीमला थेट कनेक्टिव्हीटी प्राप्त करून देत आहे. यामुळे महानगर गॅसला सुरक्षित व अखंडीत गॅस पुरवठा करता येणार आहे.