। मुरुड । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या पुढाकाराने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज मुरुडमधील तरुणांना ही संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सोमवारपासून या मेळाव्याला सुरुवात झाली.
अलिबागमधील जवळपास साडेतीन हजार तरुणांना हक्काचा रोजगार मिळाला. आज मुरुडमध्ये मेळावा असून तरुणांनी नोंदणी करण्यासाठी गर्दी केली आहे.