| पाली/बेणसे । वार्ताहर |
रायगड जिल्हा कुंभार समाज त्रैमासिक सभा पेण येथे पार पडली. सभेची सुरुवात दिलीप साळवी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवून केली. आपल्या समाजाला सरकारकडून कोण कोणत्या योजना आहेत आणि त्या आपण कश्या प्रकारे अमलात आणू शकतो, त्या संदर्भात जिल्हा कुंभार समाज अध्यक्ष अनंत महाडकर यांनी सर्वाना समजावून सांगितले. सभेसाठी राजेंद्र मंगरुळकर, अनंत महाडकर, शरद कुंभार, गजानन चौलकर, नंदकुमार चिरनेरकर, कुंदन विनेरकर, दिलीप साळवी, शरद मांडलेकर, किरण मंगरुळकर, गीता कुंभार, वसंत कोलाटकर, प्रवीण कुंभार, रमेश दहिवलिकर, वसंत कुंभार, राम साळवी, राजेंद्र साळवी, दिलपेश वाडेकर, सुनील वाघोस्कर, रुपेश कुंभार उपस्थित होते.