| पनवेल | प्रतिनिधी |
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पनवेल महानगरपालिका जिल्हा अंतर्गत प्रमुख पदाधिकार्यांची बैठक खारघर सेक्टर 12 येथील तथागत महाविहारमध्ये पक्षाचे पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्ष अमोल इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये प्रामुख्याने सभासद नोंदणीवर भर देणे, क्रियाशील सभासद वाढवणे आपापल्या विभागामध्ये पक्षाचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवणे, मित्र पक्ष भाजपच्या सगळ्या सहकारी पदाधिकार्यांना विश्वासात घेऊन येणार्या महानगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तयारी करणे आदी गोष्टींवर चर्चा करण्यात आली. रवी आठवले यांनी सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी डॉ. प्रकाश शेंडगे, सुमित मोरे, शरद पाटील, सुशील महाडिक, सिद्धांत गायकवाड, किशोर गायकवाड, दिनेश जाधव, बाळासाहेब साळवे, अंकुश साळवे, आशिष कदम, नवीन सोनवणे, मल्हारी घाटविसावे, संतोष सोनकांबळे, रोहित गायकवाड, प्रदीप कांबळे, शैलेश घाटविसावे, संदीप घाटविसावे, माणिक सोनकांबळे, सुकेश सोनकांबळे, प्रभू जाधव, अनिल जाधव, सुशील कांबळे, शरद कांबळे, विशाल पगारे आदि उपस्थित होते.