। कोल्हापूर । प्रतिनिधी ।
प्रशासकीय अधिकार्यांच्या बदल्या होताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो असा खळबळजनक दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. सध्या बदल्यांचा हंगाम सुरू आहे आणि या बदल्यांसाठी लाखोंच्या पट्टीत दर निघाले असल्याचे शेट्टी म्हणाले. तसेच त्यांनी अधिकारी, कर्मचार्यांच्या बदल्यांचे रेटकार्डच जाहीर केलं आहे. तलाठ्यासाठी पाच लाख, तहसीलदारसाठी 25 लाख तर जिल्हाधिकारी यांच्या बदलीसाठी 5 कोटींचे दर ठरले असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला आहे.या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.