राजा केणी यांच्या विरुद्ध तक्रार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने अस्वस्थ झालेल्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी खोडसाळपणा करीत शेकाप नेते माजी आ. पंडित पाटील यांच्या आवाजाची खोटी क्लिप व्हॉटस्अॅप ग्रुपवर व्हायरल केल्याची तक्रार दाखल झाली आहे. अलिबाग पोलिस तसेच सायबर विभागात पंडित पाटील यांनी शनिवारी (दि.29) संध्याकाळी याबाबतची लेखी तक्रार केली आहे.
या तक्रारीनुसार युनिटी ऑफ महाराष्ट्र नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर राजा केणी यांनी शनिवारी (दि.29) दुपारी 3 वाजून 13 मिनिटांनी एक ऑडिओ क्लीप व त्यासोबत पंडित पाटील यांचे नाव वापरून एक संदेश पाठवला आहे. सदरची ऑडिओ क्लिप ऐकताय ती ऑडीओ क्लिप बनावट असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. सदर ऑडिओ क्लिपमध्ये आपल्या आवाजाची नक्कल करून संभाषण केल्याचे आढळून येत आहे. प्रत्यक्षात आपण असा कुठल्याही प्रकारचा फोन कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुक अधिकारी श्री मोरे यांना केलेला नाही. तरी सदरची ऑडीओ क्लिप व संभाषण ऐकल्यावर व त्या सोबत पाठविलेला संदेश बघितल्यावर माझी पूर्ण पणे खात्री झाली आहे की, राजा केणी याने जानुन बुजुन माझी बदनामी व लोकांमध्ये माझ्या बाबतीत संभ्रम निर्माण करण्याचे काम केले आहे.
सदर संदेश रॉजर ग्रुप व इतर अनेक व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठविला आहे. त्यामुळे राजा केणी यानी केलेल्या बेकायदेशीर कृत्यामुळे माझी नाहक बदनामी झाली आहे. मी एक प्रतिष्ठीत नागरीक असुन अलिबाग मुरुड मतदारसंघातू आमदार म्हणून निवडून आलो होतो. तसेच मी विविध संस्थावर देखील अनेक पद भुषविली आहेत व भूषवित आहे. माझी त्यामुळे राजा केणी याने केलेला बेकायदेशीर कृत्यामुळे अब्रू नुकसानी, बदनामी व प्रतिष्ठा हानी झालेली आहे.
सदर ऑडीओ क्लिप व संदेश याची आपण गांभिर्यपूर्वक चौकशी करून तसेच श्री मोरे यांचा फोन रेकॉर्ड घेवून माझ्या नावाने त्यांना केलेला फोन नंबर तसेच माझ्या आवाजाची केलेली नक्कल याची चौकशी करून, राजा केणी व त्या सोबत असलेले सर्व दोषी यांची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पंडित पाटील यांनी केली आहे.