| म्हसळा | प्रतिनिधी |
श्रुती शिगवण पोलीस दलात भरती झाल्या बद्दल तिचा सत्कार म्हसळा पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालय आणी पत्रकार यांचा संयुक्त विद्यमाने म्हसळा पोलीस स्टेशनमध्ये आयोजित केला होता. यावेळी निवासी नायब तहसीलदार गणेश तेलंगे, महसूल नायब तहसीलदार धर्मराज पाटील, ज्येष्ठ पत्रकार संजय खांबेटे, शशिकांत शिर्के, सुनील शिगवण, पोलीस कर्मचारी उपस्थीत होते. सदरचा यश मिळविण्यासाठी आई वडील, गुरुजनवर्ग आणि ग्रामस्थ यांनी केलेले मार्गदर्शनाचे जोरावर जिद्द आणि चिकाटीने केलेली मेहनत अखेर फळास आली असल्याचे तीने सांगितले.