पेव्हर ब्लॉक, चेकर लादी बसविण्याच्या कामाचा शुभारंभ
उरण | वार्ताहर |
चिर्ले ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा शेकापचे ज्येष्ठ नेते कै. शंकर टकले, शर्मिला टकले यांच्या द्वितीय पुण्यतिथीचे औचित्य साधून गावठाण गावातील अंतर्गत रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक, चेकर लादी बसविण्याच्या कामांचा शुभारंभ शनिवारी (दि.20) माजी सरपंच दीपक मढवी, विद्यमान सरपंच सुधाकर पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
माजी आ. विवेक पाटील यांचे समर्थक असलेल्या कै. शंकर टकले व शर्मिला टकले या दाम्पत्याचे कोरोनाच्या संकटात निधन झाले होते. त्यांच्या द्वितीय पुण्यतिथीचे औचित्य साधून माजी सरपंच दिपक मढवी यांनी गावठाण गावात सामाजिक जीवनाशी बांधिलकी जपत अंतर्गत रस्त्यांच्या सुशोभिकरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी चिर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर पाटील, प्रभाकर पाटील, माधव घरत, ग्रामपंचायत सदस्य आकाश टकले, विकास पाटील, हिराजी मढवी, सुनील मढवी, राजेश पाटील, रोशन सुरेश डाकी, विश्वनाथ पाटील, सुनील घरत, रंजित पाटील, प्रसाद पाटील, निखिल मढवी, धनंजय मढवी, उत्तम टकले, किशोर मढवी, जनार्दन मढवी, अंकुश पाटील, प्रल्हाद मढवी, आशिष मढवी, अक्षय मढवी, केशव घरत, संदीप घरत, शरद घरत, महेश मढवी, तुळशीराम मढवी, अनुराग मढवी, नारायण ठाकूर, धनंजय मढवी, राजेंद्र विजय पाटील यांच्यासह शेकापचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.