| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जवळपास गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असणाऱ्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्त्या होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात झालेल्या सुनावणीमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या नियुक्त्या करण्यासंदर्भातले निर्देश दिले आहेत. त्यामुळे लवकरच राज्यपालांकडून नियुक्त्या केल्या जाण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपाची चर्चा असताना आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता विधान परिषदेत कुणाची वर्णी लागणार, याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे.
मविआ सरकारच्या काळात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 12 व्यक्तींच्या यादीवर कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यानंतर वर्षभरापूर्वी सरकार बदलल्याने दरम्यान, यानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या पार्श्वभूमीवर या सदस्यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीवर न्यायालयाने स्थगिती आणली होती. अखेर आज ती स्थगिती उठवण्याचा निर्णय सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिला आहे.