| मुरूड – जंजिरा | वार्ताहर |
येथील हिंदू एज्युकेशन सोसायटी संचलित ओंकार विद्या मंदीर, मुरुड मध्ये इ .1 ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना 150 विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकांचे मोफत वाटप संस्थेचे चेअरमन दिलीप जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पुणे येथील अर्चना जोशी व दर्शना कुलकर्णी या भगिनींनी स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध करून दिल्याची माहिती ओंकार विद्या मंदीराच्या अध्यक्षा दीपाली जोशी यांनी शिक्षक -पालक सभेत दिली. उल्लेखनीय बाब म्हणजे गतवर्षी दिलेल्या स्वाध्यायिका ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित सोडविल्या त्यांना उत्तेजनार्थ टिफीन बॉक्स ही वितरित करण्यात आले. प्रास्तविक करतांना मुख्याध्यापिका प्रविता गार्डी यांनी वर्षभराचे नियोजन ही पालकांना सांगितले. या वेळी उपमुख्याध्यापिका अश्विनी पाटील, व्यवस्थापन समिती सदस्या उषा खोत, मनिषा फाटक, सुनिल विरकुड आदी उपस्थित होते .