• Login
Thursday, April 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

कपारीतले मरण

Varsha Mehata by Varsha Mehata
July 20, 2023
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
45
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

एकविसाव्या शतकात जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा आणि ज्याचा शेअर बाजार साठ हजार, सत्तर हजार असा धावतो आहे अशा देशाच्या आर्थिक राजधानीपासून केवळ शे-दीडशे किलोमीटर अंतरावर हजारो लोक दगडकपारीत जीव मुठीत धरून जगताहेत हे भीषण वास्तव आहे. माध्यमांमध्ये चोवीस तास चिवडला जाणारा राजकारणाचा चिखल आणि सोशल मिडियामधून कोसळणारे चमकदार घटनांचे डोंगर यांच्या दरडींखाली हे वास्तव रोजच्या रोज खोल गाडले जात असते. कधी कधी निसर्गालाच हे सर्व असह्य होत असावे आणि त्या कडेकपारीतल्या आयुष्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तो असले उफराटे प्रपात घडवत असावा. इर्शाळवाडीत बुधवारी रात्री जे काही घडले तो निसर्गाचा प्रकोप खराच, पण तिन्ही त्रिकाळ आर्थिक विकासाचा गजर करणारा समाज आपल्यापैकीच काही लोकांना जेव्हा किड्यामुंगीइतकीच किंमत देतो तेव्हा काय घडते याचेही ते उदाहरण आहे. इर्शाळवाडीच्या वस्तीत काही मिनिटांमध्ये होत्याचे नव्हते झाले. हा मजकूर लिहित असेपर्यंत मृतांचा आकडा 15 आहे व तो वाढण्याची शक्यता आहे. अनेकांना वाचवण्यातही यश आले आहे. भीती व्यक्त होते आहे त्यानुसार फार मनुष्यहानी झाली नसेल तर ते चांगलेच आहे. पण तरीही घटनेचे गांभीर्य कमी होणारे नाही. काल संध्याकाळपर्यंत एक नांदती असणारी वस्ती आज दरडीखाली दबून गेली आहे आणि तिथल्या माणसांच्या आयुष्यात अचानक अंधःकार पसरला आहे. मुख्यतः आदिवासी ठाकर समाजाची वस्ती असलेल्या या वाडीत 48 कुटुंबातील सुमारे सव्वादोनशे लोक राहत होते. पण या वाडीत जाण्यासाठी धड रस्ता नाही, केवळ पायवाट आहे. मदत कार्यात त्यामुळे प्रचंड अडथळे आले. या वस्तीकडे जाण्यासाठी उभा चढ चढून जाताना एका जवानाला प्राणाला मुकावे लागले. अशा या दुर्गम परिसरात इथल्या लोकांची आयुष्येच नव्हे तर अनेक पिढ्या गुजरल्या आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे. या घटनेच्या निमित्ताने तरी बाकीच्या समाजाचे त्यांच्याकडे लक्ष जाईल अशी आशा आहे.
नेत्यांना थांबवा
अशा प्रसंगांमध्ये मदत व पुनर्वसन कार्यामध्ये अलिकडे फार सफाई आली आहे. त्यामुळे रायगडचे प्रशासन काल घटना घडल्यापासून दोन-तीन तासात तेथे दाखल झाले. तळिये किंवा मावळातल्या माळीणच्या दुर्घटनांमधील कामाचा अनुभवही सरकारच्या गाठीशी आहे. मात्र मोबाईल फोन आणि जेसीबी यंत्रांच्या सुविधाही नाकाम ठराव्यात असे प्रदेश आपल्याच अवतीभवती आहेत आणि पावसाच्या मार्‍यापुढे आपण हतबल ठरू शकतो याचा अनुभव या यंत्रणेला गुरुवारी आला. या सर्व संकटांवर मात करून जवानांनी जे अथक परिश्रम केले व पुढचे चार-पाच दिवस ते करतील त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. अशा घटना घडताच राजकारणी मंडळी तेथे धाव घेतात. आपले सध्याचे मुख्यमंत्री तर यात सर्वात पुढे असतात. गुरुवारी ते दोन तास अवघड चढण चढून प्रत्यक्ष घटनास्थळी गेले. त्यांचे व इतरांचे असे धावून जाणे हे तेथील जवानांना स्फूर्ती देते की मदतकार्यात अडथळे निर्माण करते हे सांगणे कठीण आहे. पण आधीच विविध प्रश्‍नांनी कावलेली सरकारी यंत्रणा नेत्यांभोवती गुंतून पडणे हे काही फारसे चांगले नव्हे. मुख्यमंत्री वा अन्य लोक नियंत्रण कक्षातून घटनास्थळावरच्या स्थितीचा सहज आढावा घेऊ शकतात. त्यांना योग्य त्या सूचना करू शकतात. काल ते घटनास्थळी आल्यानंतर दुर्घटनेचे दुःख बाजूला राहिले आणि टीव्ही वाहिन्या मुख्यमंत्री अवघड स्थितीतही तेथे कसे पोचले याचीच गौरवपर वर्णने करू लागली. उद्या चुकून पंतप्रधान येथे आले तर मग पाहायलाच नको. प्रशासनासाठी इथून पुढचे दिवस अधिक खडतर असतील. दहा ते वीस फूट दगडमातीचा ढिगारा उपसणे हेच आव्हानात्मक आहे. उद्या-परवा कदाचित या भागात एकाएकी मदत साहित्याचा व बघ्या माणसांचा पूर येईल. तो रोखावा लागेल. या घटनेतून वाचलेल्यांना आर्थिक व मानसिक आधार द्यावाच लागेल. पण ते दीर्घ काळ चालणारे काम असेल.
सह्याद्री वाचवा
सह्याद्री हा पर्यावरणदृष्ट्या अत्यंत नाजूक प्रदेश असल्याचे माधव गाडगीळ समितीने सांगितले आहे. सत्य हे आहे की, आपण आपला हा प्रिय सह्याद्री पालघरपासून कोल्हापूरपर्यंत सर्व बाजूंनी पोखरून टाकलेला आहे. द्रुतगती महामार्ग, रस्ते, पूल, रेल्वेमार्गाचे शॉर्टकट, बोगदे, डोंगरात हॉटेले, शेतघरे, लवासासारख्या वस्त्या, नवीन महाबळेश्‍वरसारखी शहरे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गातील खाणी असा हा तथाकथित विकास दिवसागणिक वाढत चालला आहे. शतकानुशतके उन्हापावसात बेडरपणे उभे असलेले सह्यकडे आपण खिळखिळे करीत आहोत. याला आळा घालण्याची मागणी हीदेखील मागास मानली जात आहे. तसे प्रयत्न तर दूरच राहिले. माधव गाडगीळांच्या ज्ञानाविषयीच शंका घेणारे लोक महाराष्ट्राच्या राजकारणात नेते म्हणून वावरत आहेत. माळीण किंवा आता इर्शाळवाडीसारख्या घटना घडल्या की आपल्या चुकांची तात्पुरती जाणीव होते. पण ही उपरती फार काळ टिकत नाही. हवामानातील बदलांमुळे थोड्या काळात प्रचंड पावसाच्या घटनाही वाढत चालल्या आहेत. इर्शाळगडाच्या आसपास गेल्या दोन दिवसात पाचशे तर वर लोणावळ्यात सातशे मिलीलीटर पाऊस झाला. प्रचंड वृक्षतोड आणि वाटेल तसे कापलेले डोंगरकडे यामुळे हे इतके पाणी धरून ठेवेल अशी भूरचना कमी होत चालली आहे. त्यातून मग सावित्री नदीला अचानक पूर येणे किंवा दरडी कोसळणे असे प्रकार वाढतात. इर्शाळवाडीची घटना हा त्यातलाच प्रकार आहे. राज्यकर्ते, प्रशासन व आपण जनता यांनी आता तरी या सर्वांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. पर्यावरण रक्षण हा निव्वळ फावल्या वेळच्या चर्चेचा विषय राहिलेला नाही. तो आपल्या सर्वांच्या घरादाराशी येऊन भिडलेला आहे. इर्शाळवाडी ही दूर डोंगरकपारीतली दुर्घटना नाही. ती कोकणात कधीही कोठेही घडू शकेल अशी स्थिती आहे. तिथे डोंगर कोसळला, दुसरीकडे पूर येईल. अन्य कोठे गावे समुद्राखाली जातील. निसर्गाचे ऐका- सावध व्हा.    

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

आशाताई शिंदे यांचा अभिष्टचिंतन सोहळा

Next Post

जीएसटीमधील नवे स्वागतार्ह बदल

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post

जीएसटीमधील नवे स्वागतार्ह बदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?