कोलाड विभागात एकच खळबळ
रोहा | प्रतिनिधी |
कोलाड पुई येथील डोलवहाल धरण आपल्या कुटुंबासमवेत पर्यटन करण्यास आलेल्या 21 वर्षीय तरुणाचा कोलाड पुई येथील नदीत बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना 10 जून रोजी घडली. या घटनेमुळे कोलाड विभागात एकच खळबळ माजली आहे.
याबाबत कोलाड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मोहम्मद असिफ अब्दुल रहमान खान वय वर्ष (21) रा तळेगाव जिल्हा पुणे, मूळ पत्ता दुसरा मजला,गुलाब रबानी बिल्डिंग,९०/एच/४/१, डॉ. सुधीर बोस रोड, कोलकत्ता, वेस्ट बंगाल. याचे कुटूंबातील मावशी मोमीन खातून ,मावस भाऊ एयाज खान व अय्यज खान,मावस बहीण बुशरा हाफीजूर रहमान खान रा.धारावी हे डोलवहाल धरण व परिसर पर्यटन करण्यास आले असता सदरील कोलाड पुई धरणाखालील नदीच्या पाण्यात इसम नाव असिफ अब्दुल रहमान खान वय 21 रा तळेगाव जी पुणे हा पाण्यात पोहत असतांना खोल पाण्यात व भवऱ्यात अडकून पाण्यात बडून मयत झाला.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेक एन जी पवार ,बंदुगडे ,अशोक म्हात्रे ,सय्यद राऊळ यांनी धाव घेत सोबत स्थानिक ग्रामस्थ हरीश सानप संभे,सल्लाउद्दिन अधिकारी,जिक्रिया करणेकर ,रा कोलाड मोहल्ला ,संजय कोळी रा पुइ आदिवशिवादी चंद्रकांत दळवी रा पुई गाव यांच्या मदतीने पाण्यात शोध घेऊन मायतास पाण्याबाहेर काढून दवाखान्यात नेण्यात आले व डॉक्टर यांनी तपासले असता मयत झाल्याचे सांगितले त्यानुसार अकस्मात मयत मृत्यूची नोंद दाखल करून अधिक पुढील तपास करीत असल्याचे सांगितले आहे.