मॅक्सवेलने उचलले मोठे पाऊल

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

आयपीएल 2024 दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. लागोपाठच्या पराभवांमुळे अडचणीत आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा धक्का बसला आहे. खराब फॉर्ममध्ये झगडत असलेल्या स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल 2024 सीझन-17 मधून ब्रेक घेतला आहे. यामागचे कारणही त्यांनी दिले आहे.

ब्रेक घेण्यापूर्वी ग्लेन मॅक्सवेल म्हणाला की, कदाचित आता वेळ आली, माझ्या जागी संघात दुसर्‍याला संधी देण्याची. हा निर्णय माझ्यासाठी सोपा होता. मला स्वतःला थोडी मानसिक आणि शारीरिक विश्रांती देण्याची गरज आहे. याबाबत मी प्रशिक्षक आणि कर्णधाराशी बोललो होतो. जर संघाला माझी आणखी गरज भासली तर मी निश्‍चितच ठोस मानसिकतेने पुनरागमन करेन. पॉवरप्लेनंतर संघासाठी माझ्याकडून अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

Exit mobile version