आंबेवाडी नाक्यावरून दुचाकी चोरीला

| कोलाड | वार्ताहर |

कोलाड येथील आंबेवाडी नाक्यावरील रहिवासी चंद्रकांत लोखंडे यांच्या मालकीची लाल-काळ्या रंगाची बजाज पल्सर (एमएच-06-बीक्यु-4115) मोटारसायकल मंगळवारी (दि.4) रात्री 9:35 वाजताच्या सुमारास चोरीला गेली आहे. चंद्रकांत लोखंडे यांच्या घरासमोररून अज्ञात चोरट्याने मुंबईच्या दिशेने चोरून नेली असल्याचे सीसी टीव्हीमध्ये निदर्शनास आले आहे. याविषयी कोलाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सीसी टीव्ही मध्ये चोरटा अस्पष्ट दिसत आहे. परंतु, कोणाला संबंधीत दुचाकी कोठे आढळून आल्यास चंद्रकांत लोखंडे 9421168033 यांच्याशी संपर्क करावा, अशी विनंती करण्यात येत आहे.

Exit mobile version