| दापोली | प्रतिनिधी |
थंड हवेचे ठिकाण मिनी महाचलेश्वर म्हणून ओळखल्या जाणार्या दापोली शहर गेले दोन दिवस सकाळच्यावेळी दाट धुक्यांच्या दुलईत लपटल्यासारख्या दिसत आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी पराबाहेर पडलेले नागरिक या दाट धुक्याचा मनमुराद आनंद येत आहेत.
दापोली तालुक्यात मागील काही दिवस दररोज सायंकाळच्या सुमारास पाऊस पडत होता. सकाळी व दुपारी कडक ऊन तर संध्याकाळी पाऊस अशी स्थिती होती. सतत वातावरणातील होणार्या बदलामुळे विविध साथीचे रोग पारत असून, नागरिक त्रस्त झालेले होते. आजना उद्या वातावरणात बदत होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती. त्यानुसार गेले दोन दिवस वातावरणात बदत झाला आहे. सकाळीच घराबाहेर पडलेल्या नागरिकांना दाट धुक्याचा आनंद घेता येत आहे.
घाटपरिसरात दाट धुके असल्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या वाहनचालकांना वाहन चालवणे कठीण जात आहे. निसर्गातील बदलांमुळे दुपारपर्यंत कडक उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे ऑक्टोबर हीट जाणवत आहे. परतीच्या पावसाने कायमची रजा घेतल्यामुळे दापोलीत समाधानकारक वातावरण आहे. शेतकरीवर्गाचीही कापणीची लगबग सुरू असून, शेतातील धान्य घरात नेण्याची त्यांची धांदल सुरू झाली आहे.
पर्यटनालाही मिळेल चालना
दापोलीला पर्यटकांची मोठी पसंती असते. सध्या दिवाळीच्या सुटया सुरू झाल्या आहेत. पहिले दोन दिवस सणांचा आनंद साजरा केल्यानंतर पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडतील. सध्या गुलाबी थंडीची चाहूल लागल्यामुळे पर्यटनालाही चालना मिळणार आहे.







