नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांचे प्रतिपादन
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूडमध्ये अनेक रक्तदान शिबीर आयोजित करणार. या शिबिरामधुन एखाद्या आपल्या छोट्याशा प्रयत्नाने जर एखाद्या कुटुंबाला आणि माणसाला मदत होत असेल, तर आपल्यासाठी फारच मोठी गोष्ट आहे, असे मत मुरूड जंजिरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांनी व्यक्त केले. मुरूड महादेव कोळी समाज, महादेव कोळी समाज राजपुरी कोळीवाडा व डॉ. मंगेश पाटील यांचे श्रीयश हॉस्पिटल आणि शासकीय रक्तपेढी जिल्हा रुग्णालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने 11 वर्ष रक्तदान शिबीर आयोजित केले. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रस्तुती तज्ज्ञ डॉ. मंगेश पाटील, जंजिरा मेडिकल असोसिएशन मुरुड अध्यक्ष संजय पाटील, डॉ.श्रीया पाटील, अंजली पाटील, नगरसेवक मनोज भगत, सागर कन्या मच्छीमार सहकारी सोसायटीचे चेअरमन मनोहर बैले, उपाध्यक्ष मनोहर मकु, नगरसेवक ॲड.रुपेश पाटील, नरेंद्र गिदी, नरेंद्र घागरी, उल्हास मकु, शिवाजी थळे, शुभांगी थळे, गजानन पाटील, महेंद्र पाटील, डॉ.केतकी पाटील, संदिप पागे, महेंद्र मोहिते, डॉ अमित बनकर, डॉ.राज कल्याणी, डॉ.मयुर कल्याणी, डॉ.हितेश जैन, डॉ.वसीम पेशमाम, चिंतामणी मकु, डॉ. दिपक गोसावी, डॉ.इप्सित पाटील, अभय पैर, नगरसेविका प्रिती चौलकर, नगरसेविका प्राजंली मकु, डॉ.मकबुल कोकाटे, उप पोलीस निरीक्षक अर्चना मोगरे, विजय गिदी आदिंसह मान्यवर रक्तदाते उपस्थित होते.
रक्तदान शिबीर आयोजित करणार

Exif_JPEG_420