। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत शहरातील एका विवाहितेची छेडछाड केल्याच्या आरोपावरुन खोपोलीतील मयूर चव्हाण या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या महिलेचा पती नोकरीनिमित्त परदेशात असतो.ती इकडे आपल्या दोन मुलांसह वास्तव्य करुन आहे.
ढेकू गावातील तरुणाने विवाहित महिलेच्या असहायतेचा फायदा घेवून संबंधित विवाहितेचा मोबाईल नंबर मिळविला.त्यांनतर त्या तरुणाने रात्रीची वेळी महिलेला मोबाईलवरुन व्हाईस कॉल करुन तिच्याशी अश्लिल शब्दात बोलून तसेच विनयभंग केला. अखेर घाबरलेल्या विवाहित महिलेने कर्जंत पोलिस ठाणे गाठून मयुर चिंतामण चव्हाण यांच्याविरोधात तक्रार केली असता पोलिसांनी मयुर चव्हाण यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता 1860 कलम 509 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.याबाबत कर्जंत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.डी.कोल्हे अधिक तपास करीत आहेत.