| मुरुड | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील विहुर ग्राम पंचायत हद्दीतील खेळाचे रौदं नामक मैदानावर जिल्हाधिकारी यांची समुद्र किनारी ड्रोन उडविण्यास बंदी असतांना देखील रविवारी (30 जानेवारी ) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ड्रोन कमेराद्वारे शूटिंग करणार्या विरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार पोलीस नाईक परेश म्हात्रे यांनी दिली आहे.
विहुर ग्राम पंचायत हद्दीतील हद्दीतील रौदं हे खेळाचे मोठे मैदानावर समुद्र किनारी ड्रोन उडविण्यास बंदी असतांना देखील सरफराज मोहमद सईद सय्यद,रा, नागोठणे टक्का मोहल्ला, व अल्लादिन फैयाज मोबिन,रा.बेलसे, ता-पेण, यांनी हे चित्रीकरण केले होते. विहूर रौद हा परिसरातील मोठी जागा एका खाजगी मालकाने विकत घेतली असून सध्या ही खाजगी मालमत्ता झाली आहे.त्यामुळे खाजगी मालकीचे चित्रीकरण झाल्याने सध्या हा वाद चांगलाच रंगला आहे. विहूर ग्रामस्थ व खाजगी मालक यांच्यात सध्या मोठा वाद सुरु आहे.यातच मालकाची परवानगी न घेता ड्रोनद्वारे चित्रीकरण केल्याने मोठा वाद निर्माण होऊन ड्रॉनद्वारे शूटिंग करणार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही इसम नागोठणे येथील असून त्यांना या गावातील दोन व्यक्तींनी आमंत्रित करून शूटिंग करण्यास सांगितले होते हे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे मुरुड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.याच्यावर 188,109,व 34 प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.