मारहाण प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल

| माणगाव | वार्ताहर |

माणगाव तालुक्यातील एचडीएफसी बँक शाखा मोर्बा येथील गार्डला मारहाण केल्या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना (दि. 28) मार्च रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मोर्बा येथे घडली होती. याबाबतची फिर्याद शुभम नागेश दाभेकर ( 24) रा. कुमशेत यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील आरोपी गणेश तुकाराम पवार (वय-27) रा. शिरवली आदिवासीवाडी याने शुभम दाभेकर हा सेवेत असताना आरोपी गणेश पवार हा दारू पिऊन येऊन त्या ठिकाणी झोपला होता. याबाबत गार्डने बँक मॅनेजर सतपाळसिंग जावरा याना आरोपी याचे नाव सांगितले. या गोष्टीचा मनात राग धरून आरोपी याने फिर्यादी याना शिवीगाळ, दमदाटी करून हाताबुक्याने मारहाण करून डोक्यात दुखापत केली. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत भोजकर हे करीत आहेत.

Exit mobile version