विनयभंगप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल

| माणगाव | प्रतिनिधी |

तालुक्यातील एका गावात विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना दि. 7 रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या घराशेजारी घडली.

याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील फिर्यादी महिला यांच्या गावात लग्नाची वरात आली होती. ती पाहण्यासाठी ती आपल्या मुलाला सोबत घेऊन गेली होती. त्या मुलाला झोप येत असल्याने फिर्यादी महिला मुलाला घरी घेऊन जात असताना त्यांच्या घराशेजारी आल्यावर आरोपीने त्यांना आवाज देऊन थांबविले. यानंतर आरोपीने या महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. गायकवाड हे करीत आहेत.

Exit mobile version