| माणगाव | प्रतिनिधी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना दि.10 रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील पाणसई आदिवासीवाडी येथे फिर्यादी महिलेच्या राहत्या घरात घडली.
याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील फिर्यादी महिला घरात स्वयंपाक करीत असताना त्यांच्या घरात राहणाऱ्या आरोपीने घराच्या पाठीमागील दरवाज्यातून घरात प्रवेश करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. फडताडे हे करीत आहेत.