बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

| पनवेल | वार्ताहर |
दहा प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बस रस्त्यावरील पाण्यात चालवून ती पाण्यात बंद पाडण्यास कारणीभूत झाला म्हणून एका बसचालकाविरुद्ध पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाटा मॅक्रो पोलो बस क्रमांक एमएच 46 बीयू 1729 वरील चालक मोहम्मद रफिक खान (57) याने त्याच्या ताब्यातील गाडीतून दहा प्रवासी घेऊन जात होता. खारपाडा शिवमंदिर ते आपटा जाणार्‍या रस्त्यावर नदीच्या पुराचे पाणी रस्त्यावर आलेले असताना तेथे कर्तव्यास असलेल्या अधिकार्‍यांनी त्यास या रस्त्यावरुन बस चालवण्यास मनाई केली. तसेच इंसिडेन्ट कमांडर तथा तहसीलदार पनवेल यांच्या नोटीसकडे दुर्लक्ष करून बस चालवून रस्त्यावर आलेल्या नदीच्या पुराच्या पाण्यातून चालविली. स्वतःसह बसमधील एकूण दहा प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बस पाण्यात चालवून ती पाण्यातच बंद पडल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा

Exit mobile version