बस चालकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

| पनवेल | वार्ताहर |

बस चालकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आजीवली येथील केवल रमेश माळी याच्या विरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेखर मंडलिक हे नवी मुंबई परिवहन उपक्रम येथे चालक म्हणून काम करतात. ते तुर्भे डेपो येथून बस (एमएच-43-बीपी-8105) ही प्रवासी बस घेऊन खोपोली येथे जात असताना, अजीवली बस स्टॉप येथे रात्री आले. यावेळी ह्युंदाई कंपनीची गाडी (एमएच-46-झेड-5556) वरील चालक केवल रमेश माळी (30) याने शेखर मंडलिक यांना शिवीगाळ करून हाताबुक्क्याने मारहाण केली. शेखर मंडलिक हे माझी काही चुकी नाही असे बोलत असताना त्यांनी पुन्हा मारहाण केली व या भागात पुन्हा दिसल्यास मारेल अशी धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला व शासकीय काम करण्यापासून अटकाव केला. या प्रकरणी केवल रमेश माळी यांच्यावर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version