| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
आसुडगाव जवळ कार बसला आडवी लावून चालकाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी तीन अनोळखी व्यक्तींविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात 30 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. अविनाश वाडेकर हे एसटी महामंडळात चालक म्हणून काम करतात. 30 एप्रिल रोजी बोरीवली डेपोतून बस घेऊन पुण्यासाठी निघाले. पनवेल रोडवर कळंबोली ब्रिजच्या पुढे आसुडगाव येथील पेट्रोल पंपाजवळ समोर आले असता पांढऱ्या रंगाची ब्रिजाकारवरील चालकाने त्याची कार बसच्या पुढे आणून आडवी लावली. त्यानंतर कारमधील तीन व्यक्ती खाली उतरले आणि चालकाच्या केबिनमध्ये येऊन माझ्या गाडीला धडक का दिली असे वाद घालून शिवीगाळ करुन मारहाण केली. यावेळी वाहकाने चित्रीकरण केले असता तिन्ही व्यक्तींनी त्याला देखील मारहाण केली. आणि मोबाईल फोडून कुठेतरी फेकून दिला. भांडण सोडवण्यासाठी प्रवासी आले असता त्यांनाही एकाने धक्का-बुक्की करुन ते निघून गेले.







