शाळेतील मुलाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

। धाटाव । वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील देवकान्हे गावातील मराठी शाळेच्या पटांगणात दोन विद्यार्थी खेळत होते. त्यांच्यात खेळण्याच्या कारणावरून धक्काबुक्की झाली असता त्याठिकाणी फवारणी करणाऱ्या इसमाने एका विद्यार्थ्याला मारहाण केली. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहा तालुक्यातील देवकान्हे गावातील मराठी शाळेच्या पटांगणात विराट येलकर आणि सम्यक जाधव हे दोघे जण खेळत होते. त्यांच्यात खेळण्याच्या कारणावरून धक्काबुक्की झाली. त्यावेळी त्याठिकाणी फवारणी करणारे उमाजी कोंडे या इसमाने विराट येलकर या विद्यार्थ्याच्या कानाखाली व पाठीवर हाताने मारहाण केली. याप्रकरणी आरोपी कोंडे यांच्या विरोधात फिर्यादी राकेश येलकर याने तक्रार केली आहे.

याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक देविदास मूपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.ए. म्हात्रे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version