| रसायनी | वार्ताहर |
तालुक्यात बेकायदा सुरू असलेल्या मांगुर मत्स्य पालन विरोधात मत्स्य विभाग रायगड यांनी धडक तपासणी मोहिमेनंतर सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे मांगुरचा बाजाराला स्थानिकांचा देखील छुपा पाठिंबा असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. याप्रकरणी काशिनाथ पाटील, प्रसाद पाटील, मेहदूल इस्लाम काझी, नसरुद्दीन अब्दुल सत्तार बेडेकर, मुक्कम्मिल विश्वास, नसरुद्दीन मुल्ला यांना आरोपी करण्यात आले आहे. सोमवारी खालापूर तालुक्यातील महड, धामणी परिसरात तलावावर सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रायगड विभाग संजय पाटील, सहायक मत्स्य व्यवसाय अधिकारी चेतन निवलकर, सोनल तोडणकर, खोपोली सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी अजया भाटकर यांच्यासह पाटबंधारे विभाग प्रदूषण नियमक मंडळ, पोलीस विभाग, तहसील विभाग परिवहन विभाग कारवाईत सामील झाला होता. आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास पुन्हा मांगुर मत्स्यपालन सुरू होईल, अशी भीती स्थानिकांना आहे.
पैशाच्या अमिषा पोटी स्थानिक व्यवसायिकांना मदत करत असून दरवर्षी तलावाची संख्या वाढत जात आहे. महड हद्दीत तलावांची संख्या 50 वर पोहोचली आहे. तलाव खुदाई करताना कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता उत्खनन होत असून त्यानंतर निघणाऱ्या मातीवर देखील लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. यामध्ये महड तसेच, कोपरी येथील राजकीय पक्षाचे पुढारी सामील असल्याने मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.