पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर दरड कोसळली

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईवरुन कोकणात जाणाऱ्या रेल्वे मार्गावर पावसाळ्यात दरड कोसळण्याचे घटना घडत असतात. तसेच प्रकार पुणे-मुंबई आणि मुंबई-नाशिक रेल्वेमार्गावर पावसाळ्यात होतात. त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प होत असल्याचा अनुभव अनेक वेळा येतो. शुक्रवारी पुणे-मुंबई रेल्वे सेवा ठप्प होण्याची धोका निर्माण झाला होता. कारण मध्यरात्री या मार्गावर दरड कोसळली. परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांनी भर पावसात मध्यरात्रीच काम सुरु केले. सकाळी सहा वाजेपर्यंत रस्ता मोकळा करुन दिला. यामुळे पुणे-मुंबई रेल्वे प्रवास सकाळी सुरळीत सुरु झाला. खंडाळा घाटात ही दरड कोसळली होती.

खंडाळा घाटात मध्य रेल्वेच्या मिडल लाईनवर दरड कोसळल्याची घटना गुरुवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास घडली. लोणावळ्यालल जवळील मंकीहिलच्या आधी असलेल्या बॅटरीहिल जवळ किलोमीटर क्रमांक 120/121 दरम्यान हा प्रकार घडला. माती आणि काही दगड रेल्वे लाईनवर आल्याने सदर लाईन बंद पडली होती. पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर दरड कोसळली होती. चार तासांच्या प्रयत्नानंतर ही दरड हटवण्यात यश आले. खंडाळा घाटातील रेल्वेची अप लाईन आणि डाऊन लाईन सुरू असल्याने रेल्वे सेवा फारशी प्रभावित झाली नाही. काही वेळेच्या दिरंगाईने रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू होती. दरम्यान पहाटे 2 वाजता खाली आलेली ही दरड सकाळी 6 वाजेपर्यंत बाजूला करून मिडल लाईन वाहतुकीसाठी पुन्हा चालू करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे.

Exit mobile version