खेळ मांडीयला कार्यक्रमाला महिलांची गर्दी


| कर्जत | प्रतिनिधी |

उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कर्जत विधानसभा मतदार संघातील जनते साठी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी होम मिनिस्टर फेम भाऊजी आदेश बांदेकर यांच्या खेळ मांडीयला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला दुपार पासूनच महिलांनी उपस्थिती दर्शविली होती. या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मैदानात केले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. ती गर्दी इतकी होती की, आत्ता पर्यंत पोलीस मैदानावर झालेल्या कार्यक्रमांना झाली नसेल इतकी केवळ महिलांची ‘रेकॉर्ड तोड’ गर्दी होती. या गर्दीने पोलीस मैदानावरील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

आदेश बांदेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, संजोग वाघरे – पाटील, जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे-पाटील, उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, रसिका सावंत, नगराध्यक्ष व जिल्हा महिला संघटक सुवर्णा जोशी, माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, उप संघटक अनिता पाटील, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, तालुका महिला संघटिका करुणा बडेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, माजी उपसभापती श्याम साळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, मोहन ओसवाल, बाबू घारे, राजू मोरे, प्रथमेश मोरे, ऍड. संपत हडप आदी उपस्थित होते.

नितीन सावंत व सुवर्णा जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सावंत यांनी, ‘ या कार्यक्रमाला इतकी प्रचंड गर्दी होईल असे वाटले नव्हते. अनपेक्षित गर्दीमुळे माझ्या माय माऊलींना झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. महिलांना व्यासपीठ मिळावे म्हणून मी हा उपक्रम राबवित आहे. तुमचा भाऊ, मुलगा, नातू म्हणून मला सहकार्य करा व असाच पाठिंबा मला कायम द्या.’ अशी विनंती केली. त्यानंतर आदेश बांदेकरांनी विविध खेळ खेळण्या चिठ्ठ्या काढलेल्या शेकडो महिलांना व्यासपीठावर आमंत्रित केले. संगीत खुर्ची, खुर्चीत रिंग टाकणे, उखाणे घेणे आदी खेळ गीतांच्या व संगीताच्या तालावर सुरू झाले. गायिका अंजली नांदगावकर – तळेकर यांनी संपूर्ण कार्यक्रमात विविध गीते सादर केली. त्यांना की बोर्डवर स्वप्नील कदम, ढोलकीवर प्रसन्न आहिरे, अक्टो पॅडवर प्रशांत मोरे यांनी साथ संगत दिली. सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात आल्या.

खेळ सुरू असताना आदेश बांदेकर यांनी मधे-मधे महिलांना हसविण्यासाठी अनेक ‘कोट्या’ केल्या. तसेच कर्जत बद्दल सांगताना, ‘मी गंभीर आजारातून बरा झाल्यानंतर होम मिनिस्टरचा पहिला कार्यक्रम कर्जत मधील दाहिवली गावात राहणाऱ्या सौ. सुनीता व्यापारी यांच्या कडे आलो होतो. त्या माऊलीने मी येणार म्हणून घराची रंग रांगोटी केली होती. इतके प्रेम मला कर्जतकरां कडून नेहमीच मिळत आहे.’ असे सांगितले. यावेळी उपस्थित हजारो महिलांचे डोळे पाणावले. सूत्रसंचालन प्रदीप गोगटे यांनी केले. याप्रसंगी प्रसाद सावंत, दशरथ भगत, वैभव पेठे, शैलेश देशमुख, चेतन मिसाळ, सुरेखा प्रधान, प्रमिला बोराडे आदी उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल
प्रथम - सुवर्णा अनिल घोसाळकर मु. नडोदेवाडी ता. खालापूर ( स्कूटी), द्वितीय - अश्विनी नितीन दिघे
मु. वणवे, ता. खालापूर ( फ्रीज ), तृतीय - माधुरी सुनील दळवी मु.मोगलवाडी, खोपोली ( टी व्ही ), लताबाई किसन पाटील मु. भडवळ, ता.कर्जत ( वॉशिंग मशीन),
सुनीता दशरथ हिलम मु. नावंडेवाडी, ता. खालापूर ( मिक्सर )
Exit mobile version