पीएनपी संकुलात रंगला सांस्कृतिक सोहळा

| अलिबाग | प्रतिनिधी |

पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या वेश्वी संकुलातील प्रभाविष्कार सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी आयोजित होली चाईल्ड इंग्लिश मिडियम स्कूल (स्टेट बोर्ड) सांस्कृतिक सोहळ्याचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील, मेडिकल कॉलेजचे सीओ डॉ. हेमंतकुमार पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी होली चाईल्ड स्टेट बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, पीएनपी सीबीएसई स्कूलच्या मुख्याध्यापिका वेणी वेल्लईम्मल्ल, उपमुख्याध्यापिका सदाफ शाहबाजकर, शर्मिला शेट्ये, अकॅडमिक डायरेक्टर श्रुती सुतार, राजश्री पाटील व मुख्य कार्यालयाच्या मनिषा रेलकर, कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, प्राचार्य रवींद्र पाटील, प्राचार्य नितीश मोरे, मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, श्रद्धा सरदेसाई, मुख्य कार्यालयाचे हिरेन राठोड, अंकित भानुशाली, इतर शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्याविष्काराचे सादरीकरण केले.

Exit mobile version