‘एक दिवस शाळेसाठी’ विद्यार्थ्यांच्या पालकांचा उपक्रम

| रेवदंडा | प्रतिनिधी |

शाळा सुंदर असावी, या उद्देशाने राजिप शाळा चोरढेच्या विद्यार्थ्यांच्या पालकवर्गानी शाळेचे बाहय रंग सुधारण्यासाठी ‘एक दिवस शाळेसाठी’ स्त्युत्य उपक्रम राबवित श्रमदान केले.


चोरढे राजिप मराठी शाळेसाठी (दि.9) पालकांनी एकदिवसाचे श्रमदान केले. यावेळी एकूण 46 पालकवर्ग उपस्थित होते. यामध्ये मोरेश्‍वर दुकले, सुनिल घाग, गंगाराम भोईर, कमलाकर घाग, प्रमिला घाग, सुरेश तांबडे, दिनेश घाग, प्रमोद चोरढेकर, परेश घाग, माधूरी शेडगे, द्रौपदी भोईर, स्वप्नाली घाग, लीना तांबडे, वैशाली घाग, अमिषा कोटकर, दिपाली शेडगे, महानंद पाटील, अश्‍विनी घाग, संतोष भोईर, उषा चोरढेकर, अलका चोरढेकर, निकिता डोलकर, भारती घाग, पाडुंरंग काजारे, मालती शेडगे, मनिषा चोरढेकर, उज्वला घाग, रजनी भोईर, निर्मला महाडिक, कांता घाग, सुषमा महाडिक, पायल महाडिक, शेवंती महाडिक, जयमाला महाडिक, नितेश घाग, हिरा भोईर, उषा सुभेदार, दिपाली अमलीकर, राखी भिकारी, मंथना काजारे, परशुराम चोरढेकर, आदी चोरढे, सावरोली व वेताळवाडी गावातील विदयार्थ्याचे पालकवर्ग उपस्थित होते.

यावेळी पालकांनी कामात श्रमदान केले. तत्पुर्वी सुरेश तांबडे,सुनिल घाग श्रीफळ वाढवून कामाचा श्रीगणेशा केला. या कामासाठी गंगाराम भोईर व दिनेश घाग यांनी वाहतुकीसाठी टेम्पो सुविधा उपलब्ध केली. गावातील दुकानदार रवी यांनी शाळेसाठी लादी व इतर गोष्टी मुबलक किमंतीत दिल्या.

उपक्रमास विस्तार अधिकारी सुनिल गवळी यांनी भेट दिली तर अलिबाग सोसायटीचे सदस्य देवानंद गोगर यांनी पालकवर्गाचे विशेष अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुरेश तांबडे, मुख्याध्यापक संगिता भगत, उपशिक्षक विजय जाधव, देवानंद गोगर व राजेंद्र नाईक प्रतिभा वर्तक यांनी सुयोग्य नियोजन केले होते. आभार शिक्षक राजेंद्र नाईक यांनी मानले.

Exit mobile version