अल्पवयीन मुलीच्या नावे बनावट इन्स्टाग्राम खाते

| पनवेल । वार्ताहर ।
नवीन पनवेल भागात राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून त्याचा गैरवापर सुरू केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खांदेश्‍वर पोलिसांनी आयटी क्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. नवीन पनवेल भागात 11 वर्षीय मुलगी आई-वडील व लहान भावासह राहते. मे महिन्यात ही मुलगी आपल्या इमारतीच्या खाली मैत्रिणीसह खेळत असताना तिच्या नावाने इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू असल्याची माहिती मैत्रिणीने दिली. त्यामुळे या मुलीने सदर प्रकाराची माहिती आई-वडिलांना दिल्यानंतर त्यांनी सदर इन्स्टाग्राम खाते तपासले असता त्यांच्या मुलीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते उघडण्यात आले. खात्याच्या डीपीवर मुलीचा फोटो, तसेच तिच्या कुटुंबियांचे फोटो अपलोड केल्याचे आढळून आले. तसेच त्या फोटोच्या खाली वेगवेगळ्या कॉमेंट्सदेखील दिल्याचे आढळून आले. या मुलीच्या पालकांनी नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार याबाबत दाखल केली होती. सदर तक्रारीवरून खांदेश्‍वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Exit mobile version