साजगावमध्ये कंपनीत आगीचा भडका; दोघेजण गंभीर भाजले

| खोपोली | वार्ताहर |

खालापूर तालुक्यातील सजगांव येथील युनिव्हर्सल इंडिस्ट्रीयलमधील अशापूरा पेट्रोकेमिकेल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली असून आगीच्या भडक्यात दोन टँकर जळाले तर दोघेजण 30 टक्के भाजले आहेत. आग लागल्याची घटना समजातच तातडीने खोपोली नगरपालिकेची अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचून आग विझविल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

अशापूरा पेट्रोकेमिकेल कंपनीत टायरपासून ऑइल बनविले जात आहे. ऑइल टँकमध्ये स्टोर करून 200 लिटर ड्रममध्ये भरून छोट्या कंपनीला पुरवले जाते. घटनास्थळी 6 टँकर भरलेलं होते. कंपनीत आग लागतात 4 टँकरचालक वाहन घेऊन बाजुला गेले आणि दोन टँकर अडकून राहिल्याने आग लागली. यामध्ये आनंद कुमार जबरू बारी (वय -53), अमरजित राम सुलाट राव (वय -40) या दोघेही 30 टक्के भाजले असून पालिकेच्या रूग्णालयात उपचार केल्यावर ऐरोलीतील हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले आहे. पोलिस अधिकारी, अपघातग्रस्त टीम, ग्रामस्थ घटनास्थळी पोहचून मदतकार्य केल्यामुळे आग आटोक्यात आली. फॅक्टरी इन्स्पेक्टर अंकुश खराडे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे फिल्ड ऑफिसर लोहिया यांनी पाहणी करून कारवाई केली आहे.

Exit mobile version