चूल पेटवताना उडाला भडका; आजींचा रुग्णालयात मृत्यू

। पनवेल । वार्ताहर ।
चूल पेटवताना आगीचा भडका उडाल्याने त्यात 65 वर्षीय आजी भाजून त्यांचा रुग्णालयात दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील शिवकर गावात घडली. शिवकर येथे राहण्यार्‍या निर्मला राजाराम पाटील (वय 65) या नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळेस चूल पेटवत असतांना लाकडावर रॉकेल ओतल्याने आगीचा भडका उडाला. क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले.

या आगीत आजी गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

Exit mobile version