। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेली बोट कोर्लई जवळ समुद्रात बुडाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. सदर बोटीतील एक खलाशी बेपत्ता झाला आहे, तर तीन खलाश्यान वाचवण्यात यश आले आहे. रणजित खमिस यांची अन्नपूर्णा लक्ष्मी ही बोट बुधवारी (11 जानेवारी) मच्छीमारी साठी समुद्रात निघाली होती. रात्री कोर्लई येथे मच्छिमारी करीत असताना, बोटीला जलसमाधी मिळाली.
यावेळी बोटीचा तांडेल आशिष निषाद आणि राहुल निषाद आणि विशाल हे तिघे सुखरूप परतले आहेत. त्यांना दुसऱ्या मच्छिमार बोटीने मदत केली. या दरम्यान जब्बार निषाद हा खलाशी बेपत्ता झालयाची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.