नागोठण्यात उड्डाणपूल उभारावा; पंडित पाटील यांची नितीन गडकरींकडे मागणी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
नागोठणे येथे नागरिक, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नॅशनल हायवेने उड्डाणपूल उभारावा अशी मागणी माजी आम.पंडित पाटील यांनी केली आहे. तसे पत्रही त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे. नागोठणे हे मुंबई – गोवा महामार्गावरील महत्वाचे ठिकाण आहे. या शहराच्या एका बाजुला कोएसोच्या बापूसाहेब देशपांडे संकुलात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना महामार्ग तसेच रेल्वे रुळ ओलांडून जावे लागते. कोकण रेल्वेने विद्यार्थी आणि नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे रुळावर उड्डाणपूल उभारलेला आहे. तसाच पूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावर उभारणे गरजेचे आहे.

हा पूल नसल्याने अनेकदा दुर्घटना घडलेल्या आहेत. त्यातून कित्येकांचे बळीही गेलेेले असल्याचे पंडित पाटील यांनी निदर्शनास आणले आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वेळोवेळी स्तरातून मागणीही करण्यात आलेली आहे. मात्र, आजपावेतो पूलाचा उभारणी करण्यात आलेली नाही.यासाठी गडकरी यांनीच पुढाकार घेऊन महामार्गावर उड्डाणपूल उभारावा, अशी मागणीही पंडित पाटील यांनी पत्रातून केलेली आहे.

Exit mobile version