| पनवेल | प्रतिनिधी |
चार चाकी कार नाल्यात कोसळल्याची घटना रविवारी (दि.26) संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतेही जीवितहानी झाली नाही. मात्र, कारचे नुकसान झाले. रविवारी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत होता. वीज देखील गायब झाली होती. याच दरम्यान शांतीवनकडून पनवेलच्या दिशेने वेगाने एक चार चाकी कार जात होती. यावेळी महिलेचे कारवरील नियंत्रण सुटले आणि चार चाकी कार थेट नाल्यात जाऊन कोसळली. नेरे स्टॉप वर संध्याकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी असते. वेगाने आलेली कार नाल्यात कोसळल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, तीच कार वेगाने बस स्टॅन्ड जवळील नागरिकांना धडकली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने असा कोणताही प्रकार झाला नाही. कार नाल्यात कोसळल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी घटनास्थळी पोलीस उपस्थित होते.







