| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
चेक बँकेत वटवून 65 हजार 750 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी ईसमाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. आशिष बांदेकर हे पळस्पे येथे राहत असून सर्व डेंटल डॉक्टरांची पनवेल डेंटल नावाची कमिटी आहे. डेंटल वेल्फेअर असोसिएशनचा वाशी येथे कार्यक्रम होता. त्या ठिकाणी खर्चासाठी बँकेतून पैसे काढण्यासाठी ते बँकेत गेले होते. त्यांनी पनवेल बँकेत जाऊन चेक देऊन पैसे काढले आणि चेकबुक बँकेतच विसरून निघून गेले होते. त्यावेळी चेकबुक मध्ये दोन ते तीन रिकामे चेक सह्या केलेले होते. वाशी येथे कार्यक्रमाचे ठिकाणी चेकबुक पाहत असताना त्यांना चेक बुक मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी घरी फोन केला तर घरी चेकबुक नव्हते. बँकेत चेकबुक राहिले असेल म्हणून बँकेसोबत संपर्क साधला असता बँकेत चेकबुक असल्याचे समजले. त्यानंतर त्यांना काही वेळाने मोबाईलवर बँकेचा मेसेज आला आणि असोसिएशनच्या खात्यातून 65 हजार 750 रकमेचा धनादेश वटला गेल्याचे दिसून आले. त्यांच्या सभासदांने चेकचा वापर केला आहे का याची विचारणा केली असता त्यांनी चेकचा वापर केला नसल्याचे सांगितले. यावेळी चेकवर सही असलेल्या चेकपैकी एक चेक काढून तो बँकेत अनोळखी ईसमाने वटवला.
चेक बँकेत वटवून 65 हजारांची केली फसवणूक

xr:d:DAFiUNjonyk:4,j:46679222290,t:23050809