चार वाहनांचा विचित्र अपघात; ट्रकचालक जखमी

| पनवेल | वार्ताहर |
पनवेलजवळील चिखले रेल्वे ब्रिजजवळ मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर दोन ट्रक आणि दोन फोर व्हीलरचा अपघात झाला आहे. चार वाहनांनी पाठीमागून दिलेल्या धडकेत ट्रक चालक जखमी झाला आहे. ट्रक क्रमांक के ए 22 डी 1958 यांच्याविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र गायकवाड (भिवरी, पुरंदर) हे एच. 12 एस. एल. 8209 घेवून पुणे येथून मुंबईकडे जात असताना ट्रक क्र. के.ए. 22 डी. 1958 चे चालक साहेबराव किसन बजबळकर याने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने व रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून व भरधाव वेगात चालवले. आणि ट्रक क्र. एम. एच. 46 एआर.2678 या वाहनास पाठीमागून धडक दिली. त्यामुळे सदरचे वाहन रवींद्र गायकवाड यांचे तसेच वाहन क्र. एम.एच. 46 टी. 5200 ला पाठीमागून धडकून वाहनांचे नुकसान झाले. या अपघातात ट्रक क्र. एम.एच. 46 ए.आर. 2678 वरील चालक जखमी झाला आहे. म्हणुन ट्रक क्र. के.ए. 22 डी. 1958 चे चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version