| आंबेत | वार्ताहर | रायगड जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती बबन मनवे यांचे वाहनचालक निलेश ढवळे हे (दि.28) मे रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने म्हसळा पोलीस ठाण्यात दिली. मात्र, दोन दिवस उलटूनसुद्धा निलेश यांच्या बेपत्ता होण्यामागचे कारण स्पष्ट झाले नाही. अखेर पोलिसांनी निलेश यांच्यासोबत फिरणारे आणि त्यांचे मित्र अक्षय गोलंबरे यांचा तपास सुरू केला. या तपासात निलेश याला त्याच्याच मित्राने गोळी झाडून मारल्याच समोर आले.
दरम्यान, मृतदेहाला दगडाने बांधून एका डोहामध्ये ढकलून हे कृत्य लपवण्याचा प्रकार जेव्हा उघड झालं, तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. शुक्रवारी पहाटे 2 ते 4 च्या दरम्यान वांगणी येथील एका जंगलात असणार्या डोहात तपास करताना श्रीवर्धन आणि कोलाड येथील रेस्क्यू टीमला निलेशचे कपडे आणि जिवंत चार काडतुस सापडल्या. मात्र त्याची बॉडी मिळण्यास वेळ लागला त्यानंतर तब्बल चार ते पाच तासांनी पुन्हा शुक्रवारी रेस्क्यु ला शुरुवात झाली आणि अखेर शर्तीच्या प्रयत्नानंतर निलेश याची बॉडी काढण्यात आली, निलेश हा त्याचा मित्र अक्षय गोलांबरे याच्यासोबत नेहमी शिकारीसाठी जात होता मात्र त्याच्याच हातून आपला शिकार होईल हे त्यालासुध्दा कळले नसेल. अक्षयने शिकारीसाठी वापरलेली बंदूक हीसुद्धा तपासात अवैध आणि विनापरवाना असल्याच समोर आले आहे. दुसरीकडं आचारसंहिता लागू असताना, सर्व शस्त्र प्रशासनाकडे जमा असताना या शस्त्रधारकांना अभय कोणी दिले, हादेखील मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.