सुवर्णकार ऐक्यवर्धक मंडळाचे स्नेहसंमेलन

। मुंबई । प्रतिनिधी ।

रविवार दि.12 मे रोजी मुंबई अहिर सुवर्णकार ऐक्यवर्धक मंडळाचे वार्षिक सर्वसाधारण सभा आणि स्नेहसंमेलनाचे आयोजन वांद्रे (पश्‍चिम) येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात सुवर्णकार समाजाचे आराध्यदैवत श्री संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार आणि दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवानंद टाकसाळे, विनायक विसपुते, डॉ. अभय विसपुते, श्रीकांत मुरलीधर सोनवणे, डॉ. अजय भामरे, अँड. सी.डी.सोनार, अँड. राजन दीक्षित, सुरेखा सोनार, प्रभाकरजी मोर प्रकाश खरोटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर मोरे यांनी केले.

Exit mobile version