। अलिबाग । वार्ताहर ।
नवीन पनवेल येथे शनिवारी (दि.15) सुवर्णकार समाजाचे आराध्यदैवत श्री संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या 739 व्या पुण्यतिथीचे आयोजन नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाचे कार्यालय, नवीन पनवेल येथे करण्यात आले होते.
नवी मुंबई सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष प्रविण भामरे, कोषाध्यक्ष विजय भामरे यांच्या शुभहस्ते संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली. याप्रसंगी पी.के.मोरे, गोकुळ रणधीर, पांडुरंग सोनार, बाळकृष्ण वडनेरे, मुकुंद जाधव, रमेश भामरे, रविंद्र विसपुते, शशिकांत विसपुते, अनिता विभांडिक आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोषाध्यक्ष विजय भामरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गोकुळ रणधीर यांनी मानले.