जीवाया पुस्तकाचे प्रकाशन
| अलिबाग । वार्ताहर ।
कर्मवीर नगीनशेठ साळवी प्रतिष्ठान, कळवा, अहिर सुवर्णकार नवयुवक मित्र मंडळ, कळवा तसेच लाड सुवर्णकार सेवा संस्था, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने पद्माकर सोनुशेठ शिरवाडकर लिखित वेवहारे भक्ती पुजा आणि भेटी लागी जीवाअशा दोन पुस्तकाचे प्रकाशन सोहळा शक्ती सागर बंगला प्रांगण, गावदेवी मैदान शेजारी, कळवा ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. मंगलाताई सिन्नरकर, विद्याधर ठाणेकर, अँड.सुदर्शन साळवी, राजेंद्र दिंडोरकर, मुकुंदराव शहाणे, संजय खरोटे, चैतन्य वानखेडे, छबुलाल पिंगळे, अनिल विसपुते, संतोष ओझरकर, नंदकुमार पवार, मिलिंद शिरवाडकर सचिन राजापूरकर, वैभव दलाल, शुभांगी रनाळकर, मधुकर दुसाने, संजय वाघ, अँड. अधीर बागूल, प्रियांका शेट्टी, उज्वल जाधव, अनिल सुराजीवाले, छोटुलाल मोरे, महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ओम लाड, अशोक मंडलिक, अँड. सूदर्शन साळवी, सुवर्णकार समाज कळवा, ठाणे यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किर्ती मंडलिक यांनी केले आभारप्रदर्शन अजित शिरवाडकर यांनी केले.