| खोपोली | प्रतिनिधी |
कुंभिवली ग्रामपंचायत हाद्दीतील अगरवाल कोश कंपनी गेल्या दहा बारा वर्षापासून सामाजिक उपक्रमातून मदत करीत असताना कार्यरत आहे. कंपनीचे पंकजबाबू दुजोडवाला यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत हाद्दीतील ठाकूरवाडी, कातरवाडी येथील पाच जि.प.शाळांना स्मार्ट टिव्ही आणि वाँटर फिल्टर तसेच दोन हजार लिटर पाण्याच्या टाकीचे वाटप गुरूवारी (दि.20) करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजिप शाळा खरसुंडी, कुंभिवली, कुंभिवली ठाकूरवाडी, धामणी कातरवाडी येथे 55 इंच स्मार्ट टिव्ही, पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर, पाण्याची टाकीची भेट दिली.
कार्यक्रमास पंकजबाबू दुजोडवाला, बिनितकुमार झा, दिनेश राऊत, ज्ञानेश्वर गायकवाड, गिता गायकवाड, नरेंद्र जाधव, बाबासाहेब जाधव, भास्कर बारस्कर, संतोष सालेकल, तुलशीराम जाधव, शिवाजी वायफळकर, स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.