सालेगावचा एक गाव एक गणपती

100 वर्षांची परंपरा
माणगाव | वार्ताहर |
माणगाव तालुक्याच्या साले गावातील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने एक गाव एक गणपती ही संकल्पना गेली अनेक वर्षे राबविली आहे. ही परंपरा गेल्या 100 वर्षांपासून सुरू आहे. ग्रामस्थांनी आपल्या या कृतीतून एक वेगळे अनुकरणीय पाऊल टाकत सर्वांपुढे आदर्शच उभा केला आहे. गणेशभक्तांच्या नवसाला पावणारा म्हणून या गणपतीची ओळख आहे. म्हणूनच दरवर्षी या गणपतीच्या दर्शनाला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगावपासून अवघ्या चार कि.मी. अंतरावर असलेले अत्यंत छोटे व निसर्गरम्य असे हे सालेगाव आहे.
साले गावाच्या पश्‍चिमेला शिवगणेश मंदिर आहे. दरवर्षी गणेश चतुर्थीला भक्तगण या मंदिरात येतात. त्यानंतर गेल्यावर्षी गावाने बोललेला सामूहिक व वैयक्तिक असे नवस फेडले जातात. त्यानंतर पुन्हा नव्याने भक्त आपापले वैयक्तिक नवस बोलतात अशी प्रथा आहे.

Exit mobile version