माणगावात माजी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा

। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगावात शासकीय अध्यापिका विद्यालयातील माजी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा साजरा झाला. तब्बल 29 वर्षानंतर भेट झाल्याने मैत्रिणींचा आनंद गगनात मावेनासा झाला. या मेळाव्यात मैत्रिणींनी एकमेकींच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

शासकिय अध्यापिका विद्यालय माणगावच्या सन 1994-95 च्या वर्गातील मैत्रिणींचा स्नेह मेळावा तब्बल 29 वर्षानंतर मोठ्या उत्साहात माणगाव नगरीत संपन्न झाला. दोन दिवसांचा हा कार्यक्रम अतिशय उत्साही व आनंददायी वातावरणात साजरा केला. दोन दिवसांचा कार्यक्रम होळीचे रंग उधळत गोळा करत मेळावा संपन्न झाला. यावेळी प्रतिभा पुराणिक हीने आमचं माणगाव गेटटूगेदर स्वप्नं पूर्ण करावेत, घेतलेली मेहनत आणि वेळ काढून भेटायला आलेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील मैत्रिणींनी आपल्या आनंददायी प्रेमरुपी या मोहात रम्य राहून पुन्हा काही दिवसांत भेटूया, असे म्हणत नाविण्यपूर्ण जीवनातील यशस्वी पाऊल घेऊन एकमेकींनी आनंद अश्रूंनी निरोप घेतला.

Exit mobile version